घरात घुसले दरोडेखोर, 12 वर्षांच्या मुलाने केला गोळीबार अन्…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  एक 12 वर्षांचा मुलगा त्याच्या आजीसोबत असताना घरात लुटारू घुसले होते. मात्र, हा मुलगा या दरोडेखोरांना न घाबरता त्याने जोरदार विरोध केला आणि त्यानंतर ते दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पण त्यादरम्यान मुलाने गोळीबार केला होता. त्यामध्ये एकाला गोळी लागली.

अमेरिकेतील नॉर्थ केरोनिया येथे ही घटना घडली. रात्री मास्क घालून दोन दरोडेखोर आले होते. जेव्हा दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला अन् तो उघडल्यानंतर त्यांनी 73 वर्षीय लिंडा एलिस यांच्या घरात प्रवेश केला. जेव्हा या दरोडेखोरांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या मुलाने या दोन दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला. तेव्हा हे दोन्ही दरोडेखोर पळून गेले. काही वेळातच आणखी एक दरोडेखोर जखमी अवस्थेत आढळला. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

तसेच दरोडेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एलिस यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पैशांची केली मागणी

या दरोडेखोरापैकी एकाने मुलाच्या आजीच्या पायावर गोळी झा़डली आणि पैशांची मागणी करत होता. त्यावेळी ही घटना घडली.

दरोडेखोरांकडे हत्यार

एका दरोडेखोराकडे हत्यार होते. त्याने एलिस यांना जमिनीवर पाडले आणि तिच्या पायावर गोळीबार केला. सध्या या मुलावर गुन्हा दाखल होणार नसल्याचे सांगितले जात आहे. पण त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.