ट्रकचालकाला मारहाण करून दरोडा टाकणारे अटकेत

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – सोनगीर देवाभाने गावाच्या शिवारात ट्रक चालक क्लीनर यांना मारहाण करून ट्रक आणि त्यातील माल लंपास करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

नुरमहमंद अब्दुल कय्युम, महमंद असिफ यासिन अन्सारी, जावेद नईमुददीन शेख, अब्दुल हमीद मोहम्मद शरीफ खान (सर्व रा. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तालुक्यातील सोनगीर येथे १८ नोव्हेंबर २०१८ रोजी काही अज्ञातांनी देवाभाने गावाच्या शिवारात ट्रक (एम एच २० सी टी ३०४६) अडवून ट्रक चालक व क्लीनरला मारहाण करुन त्यांच्या डोळ्यांना पट्टी बांधुन त्यांना शेतात टाकले आणि त्यानंतर ट्रक व त्यामधील माल चोरुन नेला. याप्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा करतांना फक्त नेट कॉलींगचा वापर केला होता.

पोलिसांना याप्रकरणातील आरोपींची माहिती काढून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चोरीला गेलेला ट्रक ३ लाख ६३ हजार रुपये किंमतीच्या बेसन पिठाच्या एकुण २०५ गोण्या ४ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीच्या ५० किलो वजनाच्या १६० गोण्या असा एकुण १७,८४,५६४/- रु किमतीचा माल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व कर्मचारी रामकृष्ण सोनवणे, हनुमंत उगले, सुनील विचूरकर, रफिक पठाण, भामरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, गौतम सपकाळे, उमेश पाटील, रविकिरण राठोड राहुल सानप, विशाल पाटील, मयुर पाटील, मनोज बागुल, केतन पाटील, संजय पाटील यांनी केली आहे.