home page top 1

बँक कर्मचा-याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून २५ लाखांची रोकड पळवली

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – बँक कर्मचा-यांचा पाठलाग करुन त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून २५ लाख रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार आज दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. ही रक्कम तासगाव-विसापूर रोडवरलील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोकड लुटल्यानंतर चोरटे ढवळी गावाच्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी आज सकाळी तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे घेण्यासाठी आले होते. २५ लाख रुपयांची रोकड घेऊन विसापूर शाखेत जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केला.

दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी बँक कर्मचा-यांना तासगाव-विसापूर रस्त्यावरील कॅनॉलजवळ आडवले. बँक कर्मचा-यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या हातात असलेली २५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तालुक्यामध्ये नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

सिने जगत –

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली…..

 

Loading...
You might also like