चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटला ७० हजार रुपयांचा ऐवज

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन

घराची कडी तोडून २ चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला. रात्री २ वाजताच्या सुमारास खामगाव शहरातील तिरुपती नगरातही ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहर पोलिसांनी २ अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a029203c-cf6b-11e8-8be1-23d05da5ed91′]

खामगाव शहरातील आदर्शनगर रोडवरील तिरुपतीनगर भागात सुभाष दिनकरराव तोमर आपल्या परिवारासह राहतात. रात्री १० वाजताच्या सुमारास घरातील हॉलमध्ये ते झोपले. त्यांची पत्नी आणि लहान मुलगा बाजूलाच हॉलमध्ये झोपले होते. मोठा मुलगा सोफ्यावर झोपला असताना रात्री २ चोरट्यांनी कडी तोडून घरात प्रवेश केला. आवाज ऐकताच जागी झालेल्या तोमर यांच्या छातीवर एका चोरट्याने प्रहार केला. तर दुसऱ्याने चाकुचा धाक दाखवून सुभाष तोमर यांच्या पत्नी शीतल तोमर यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, सोन्याचा हार, कानातले खडे, सोने-चांदीच्या दागिन्यांसह चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकुण ७० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

[amazon_link asins=’B07H9JBSB2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eccdf1ac-cf6b-11e8-9f68-0b6dd3ba41ea’]

रात्रीच्या अंधारात सुमारे २० मिनिटे हा थरार सुरू होता. याप्रकरणी सुभाष तोमर यांच्या तक्रारीवरून २ अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका संशयित आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक अकोलासाठी रवाना करण्यात आले. तर काही आरोपींची छायाचित्रांद्वारे ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

चोरीचा बनाव करुन १ लाख रुपये हडपणाऱ्यास अटक

You might also like