पिंपरी : सराईत चोरट्याकडून तब्बल आकरा लाखांच्या दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – निगडी पोलिसांनी अटक केलेल्या एका सराईत चोरट्याकडून 10 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 13 महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. बुद्धदेव विष्णू विश्वास ( 21, रा. दत्तवाडी, आकुर्डी. मूळ रा. स्टील दुर्गापूर, जि. बौद्धमाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या वाहन चोराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक रमेश मावसकर यांना माहिती मिळाली की, थरमॅक्स चौक येथे एक तरुण बुलेटवरून संशयास्पदरित्या फिरत आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणून तपास केला असता त्याच्याजवळ असलेली बुलेट गाडी चोरीची असल्याचे सांगितले.

तसेच त्याने निगडी, डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड या भागातून 13 मोटारसायकल चोरल्या असल्याचे देखील सांगितले. त्याच्याकडून 13 दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 90 हजार रुपये कितमीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील पाच, डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे नऊ वाहन चोरी व एक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी शंकर बांगर, किशोर पढेर, सतीश ढोले, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, तुषार गेंगजे, भूपेंद्र चौधरी, अमोल साळुंखे, कोंडीभाऊ वाळकोळी, मितेश यादव, उद्धव खेडकर, गोदावरी बिराजदार यांच्या पथकाने केली.

Visit :  Policenama.com