घरफोडीतील आरोपींना दिल्लीतून अटक, पाच लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना चंदनगर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ५ लाख १५ हजार रुपयांचे १७ तोळे ४ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवार (दि.१७) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
[amazon_link asins=’B077FV77TN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc740805-9d52-11e8-be82-a706ac044fbc’]

मोहमद रिजवान अजमत अली (वय-२६ रा. लिबासपूर, उत्तर पश्चिम दिल्ली), दिपक उर्फ दिपु अजय सुभाष (वय-२७ रा. भालस्वा डेअरी, दिल्ली), उजेंद्र छत्रपालसिंह उर्फ राजुमामा (वय-३८ रा. उत्तर पश्चिम दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखील सुरेश ताडीलकर (रा. वडगावशेरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निखील ताडीलकर यांच्या घरामध्ये २५ जुलै रोजी रात्री एक ते दोन दरम्यान घरफोडी झाली होती. या गुन्ह्यात चोरट्यांनी घरातील १९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख साडेपाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींची माहिती मिळाली. चंदननगर पोलिसांनी आरोपी मोहमद अली याला दिल्ली येथून अटक केली. तर दिपक सुभाष याला दिल्ली येथील तिहार जेलमधून ताब्यात घेऊन अटक केली. उजेंद्र छत्रपालसिंह याला उत्तरप्रदेशातील प्रतापगढ येथून अटक केली.
[amazon_link asins=’B01BKKOQ5I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c73a8417-9d52-11e8-a7b8-414d383251f4′]

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ५ लाख १५ हजार रुपयांचे १७ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, लगड असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कनवरु, खडकी विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गावडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल दरेकर, पोलीस उप निरीक्षक गायकवाड, भोसले, पोलीस हवालदार अजित धुमाळ, पोलीस नाईक तुषार भिवरकर, सुभाष आव्हाड, तुषार खराडे, दत्ता शिंदे, सचिन कोळी यांच्या पथकाने केली.