…म्हणून ‘देव’ चोरीस गेले नाही !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा शहरातील बंगला फोडून चोरटे घरात घुसले. घरातील देवाच्या चांदीच्या मूर्ती एका पिशवीत भरल्या. त्या सोफासेटवर ठेवून घरातील इतर साहित्याची उचकापाचक सुरू केली. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाने चोर चोर म्हणून ओरडण्यात सुरुवात केली अन् चोरटे घाबरले. चोरटे तेथून पळून गेले. त्यामुळे पिशवीत ठेवलेल्या चांदीच्या मूर्ती चोरी होण्यापासून वाचल्या. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील डॉ. विजय बगाडे हे गुरुवारी रात्री पुण्याला गेले होते. त्यांच्या कासार गल्लीतील बंद बंगल्याचे दार उघडून आत प्रवेश केला. बंगल्यातील देवघरातील एक लाख रुपयांच्या देवाच्या चांदीच्या मूर्ती पिशवीत भरल्या. पिशवी सोफासेटवर ठेऊन चोरटे बेडरूमकडे गेले. वरच्या मजल्यावरील सागर वैष्णव यांनी जोरात चोर चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरटे पळून गेले. पळून जाण्याच्या गडबडीत चोरटे सोफासेटवर चांदीच्या मूर्ती ठेवलेली पिशवी विसरून गेले. त्यामुळे देवांच्या मूर्ती बचावल्या.

सदर चोरीची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक राजीव सातव, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जाणून घ्या – कोणत्या ऋतूत कोणत्या ‘भाज्या’ खाव्यात

सर्दीकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो दम्याचा त्रास

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलियाच्या ‘बोल्ड’ फोटोंनी पाण्यात लावली ‘आग’

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणा-या विद्यापीठांची होणार चौकशी

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव