शेतकऱ्याच्या घरी दागिन्यांची चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – साक्री तालुक्यातील निजापुरजवळील जैताणे गावातील सतिश उत्तम खलाणे या शेतकऱ्याच्या घरी चोरी झाल्याची घटना काल घडली. खलाणे हे कामानिमित्त परगावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पत्र्याचे कपाट फोडून तिजोरीतील सोने-चांदिचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

खलाणे हे गावाहून घरी परत सकाळी आले असता, त्यांना घराचे दार उघडे दिसले. घरातील साहित्य जमीनीवर फेकलेले होते. घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात त्याबाबत लेखी तक्रार दिली. निजापुर पोलीसांनी खलाणे यांच्या तक्रारी नुसार गुन्हा नोंद केला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.