बंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसवर दरोडा; महिलांचे 50 तोळे सोने लुटले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – बंगळुरू- अहमदाबाद रेल्वेत दरोडा टाकून चोरट्यांनी महिला प्रवाशांचे तब्बल 50 तोळे सोने लुटले आहे. सोमवारी (दि. 1) पहाटे सोलापूर जिल्ह्यातील बोरोटी- नागणसूर हद्दीत हा प्रकार घडला. याबाबत संबंधित महिला प्रवाशांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बंगळरु- अहमदाबाद ही एक्सप्रेस सोमवारी पहाटे बोरोटी- नागणसूर हद्दीत आली असताना चोरट्यांनी रेल्वेत दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी काही बोगीमध्ये घुसून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामळे प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशी घाबरले होते. यावेळी चोरट्यांनी महिला प्रवाशांना धमकावत त्यांच्या गळ्यातील 50 तोळ्याचे दागिने लंपास केले आहे. सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडल्याने सोलापूर लोहमार्ग पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.