पुण्यात घरफोडी करणारे सराईत अटकेत, 81 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि परिसरात घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी करणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 किलो सोने, 10 किलो चांदी, तीन लाखांची रोकड, सहा चारचाकी वाहने, 1 दुचाकी, इम्पोर्टेड पिस्टल, 6 जिवंत कडतुसे असा एकूण 81 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून तब्बल 50 गुन्हे उघडकीस आले आहेत.

उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय-27), गोरखसिंग गागासिंग टाक (वय-29), बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (वय- 30), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (वय- 26 सर्व रा. रामटेकडी हडपसर पुणे), सत्यनारायण देवीलाल वर्मा (वय-43 रा. लोणिकाळभोर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्यासह पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे घडत होते. चोरट्यांना पकडण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यातील दोन पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, रामटेकडी येथील व शहरामध्ये झालेल्या घरफोडी ठिकाणी भेट देऊन 41 ठिकाणांचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक आरोपीच्या हालचाली बारकाईने नोंदवण्यात आल्या. त्यावेळी हे आरोपी हडपसर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

वानवडी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी गोरखसिंग व उजाला हे रामटेकडी येथील अंधशाळेच्या पाठीमागे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी बल्लुसिंग व जालसिंग यांची नावे सांगितली तसेच ते धुळे येथे गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी धुळे येथे तीन दिवस आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन 50 गुन्ह्यातील 81 लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

आरोपींनी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8, कोथरुड – 2, दत्तवाडी -3, कोरेगाव पार्क-2, भारती विद्यापीठ – 4, हडपसर -6, कोंढवा -3, मार्केटयार्ड -2, बिबवेवाडी -2, चतुश्रृंगी -1, सिंहगड रोड- 1, डेक्कन – 2, विश्रांतवाडी -1, खडकी -1, भोसरी एमआयडीसी -1, वाकड -1, लोणीकाळभोर -2, शिक्रापूर -2, यवत-5 या ठिकाणी घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस सह आयुक्त रविंद्र शीसवे, अप्पर पोलिस आयुक्त पूर्वप्रादेशिक विभाग सुनील फुलारी, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सलीम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गायकवाड, रमेश भोसले, पोलीस हवालदार राजू रासगे, पोलीस नाईक संभाजी देवीकर, योगेश गायकवाड, धर्मा चौधरी, पोलीस शिपाई नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, नवनाथ खताळ, महेश कांबळे, प्रतिक लाहिगुडे, अनुप सांगले, प्रविण उतेकर, महिला पोलीस शिपाई राणि खादवे वनिता कोलते यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –