दहिसरमध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्स दुकानावर दरोडा, गोळीबारात मालकाचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

मुंबई (Mumbai) : पोलीसनमा ऑनलाइन (Policenama Online) – Robbery in dahisar | दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या दरोडेखोरांनी (robbers) ज्वेलर्स दुकानावर दरोडा (Robbery at a jewelers shop) टाकून ज्लेवर्स मालकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना मुंबईतून (Mumbai)समोर आली आहे. दहिसर (Dahisar) येथील गावडे परिसरात बुधवारी (दि. 30) सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
उडाली आहे. हत्या करुन तिघेही आरोपी पसार झाले झाले होते. त्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या आणखी दोघा साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत (Robbery in dahisar).

शैलेंद्र पांडे (Shailendra Pandey) (वय 45) असे खून झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर येथील गावडे परिसरात ओम साईराज ज्वेलर्स (Om Sairaj
Jewelers) या दुकानात 3 तरुण सोने घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आले. तिघांनी बंदुकीचा
धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटायला सुरुवात केली. मात्र त्यांना ज्वेलर्सचा मालक शैलेंद्र पांडे (Shailendra Pandey) याने विरोध केला.

त्यामुळे आपल्याला दरोडा टाकता येणार नाही, आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी शैलेंद्र पांडे (Shailendra Pandey) याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत (additional commissioner of police dilip sawant), पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (joint commissioner of police vishwas nangre patil) घटनास्थळी धाव घेतली. या तिन्ही दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हाती लागली असून या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) हे तिघेही स्पष्ट दिसून येत आहेत. मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch)  आणि दहिसर पोलिसांनी (Dahisar Police) सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV footage) आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले आहे

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ

Pune Crime Branch Police | हातात कोयते घेऊन त्याचा व्हिडीओ बनवून सोशलवर व्हायरल करणार्‍या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक

Drunk Policeman | कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा, बुलढाण्यातील संतापजनक घटना


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Robbery in dahisar jewelers owner shot dead in firing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update