धुळे : बंदुकीचा धाक दाखवत गॅस एजन्सीवर ‘दरोडा’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भल्या पहाटे पॉश एरीयात बंदुकीचा धाक दाखवत गॅस एजन्सीवर दरोडा  पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना शहरातील अग्रेसन चौकातील ऐंशी फुटी रोड वरील के. डी. मिस्तरी कॉम्पलेक्समध्ये घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गॅस एजन्सीवर दरोडा टाकण्यासाठी पाच ते सहा जण एका मारुती अल्टो कारने आले होते. त्यांनी तोंडाला फडके बांधलेले होते. प्रथम त्यांनी लाईट बंद केले. लगेचच अन्य दोन जणांनी वॉचमन तुकाराम मुकूंदा पाटील यांना पकडुन बंदुकीचा धाक दाखवला. एजन्सीच्या पहिल्या मजल्यावरील सिसीटीव्ही च्या वायर कापुन कँमेरे वाकवुन पाठिमागील दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करत लाकडी कपाटातील कप्प्यातील रोख रक्कम 25,000 लुटुन नेली.

कागदपत्र जमिनीवर फेकले. यानंतर चोरटे जाताना हातात लोखंडी रॉड, तलवार, बंदुक हातात घेत अन्य बाजुला फिरले व काही वेळात गाडीत बसुन निघुन गेले. वॉचमन यांनी मालकांना माहिती दिली. त्यानंतर आझाद नगर पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर चे पो.नि.आहेर यांनी पहाणी केली. वॉचमनला घटनेबाबत माहिती विचारली. तपास कामी श्वान विरुची मदत घेण्यात आली. श्वान चौकातील अग्रेसन चौका पर्यत मार्ग दाखवत घुटमळला.

सिसीटिव्ही फुटेज मध्ये चार ते पाच जण तोंडाला रुमाल बांधलेले चोरटे दिसत आहेत अशी माहिती पोलीससुत्रांकडून मिळाली आहे. सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास पोलीस करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून असा करा बचाव

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक
कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?