धुळे : पोलिसाचे घर अन् ज्वेलर्सचं दुकान चोरट्यांनी फोडलं

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – साक्रीरोड परिसरात अ‍ॅड. मेजर अरुण कुमार वैद्य नगरातील पोलीस कर्मचाऱ्याचे घर व विद्यावर्धीनी महाविद्यालय पाठिमागे असलेले श्री. सिध्दीविनायक ज्वेलर्स मधुन चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केला.

सविस्तर माहिती की शहरातील साक्री रोड अ‍ॅड. जनरल अरुण कुमार वैद्य नगरातील पो.हे.काॅ.भिका पाटील नेमणुक तालुका पो.स्टे. काल रात्री आर्वी ओ.पी. बंदोबस्ताला होते. यांचे घर बंद होते. घरातील अन्य जण दिवाळी निमित्त परगावी गेले होते. बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी कडीकोंडा तोडुन आत पहाटेच्या वेळी घरात प्रवेश करुन लोखंडी कपाट फोडुन कपाटातील 29 ग्रॅम सोने, लहान मुलीचे चांदीचे पैंजण अंदाजे 3000 हजार रुपयांचे व 20,000 रोख असा ऐवज लंपास केला. चोरटे सिसीटिव्हि कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तीन ते चार जण आहे, अशी माहिती भिका पाटील यांनी दिली. काही अंतरावर असलेले श्री सिध्दी विनायक ज्वेलर्स दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयांचे बेन्टेक्सचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

चोरी बाबत शहर पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पहाणी केली. श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञांची मदत घेण्यात आली. सिसीटिव्हीतील फुटेज आधार पोलीस तपास करत आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like