शहरात चोरट्यांचा धुमाकुळ ! एकाच राञी बंद घरे,दुकाने फोडुन लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील साक्री रोड महिला कॉलनीतील पोलीस कर्मचारीचे घरी चोरट्यांनी चोरी करुन सोने,चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली.पश्चिम देवपुर हद्दीतील एक घरफोडी तसेच देवपुर नगाव बारी परीसरातील अशोक नगरात तीन घरे व एका दुकानातून साड्या व रोख रक्कम चोरट्यांनी चोरुन नेले आहे.

दिवाळी सणाच्या सुट्टयामुळे नागरीक परगावी गेल्याने एकाच राञी चोरट्यांनी घरे, दुकानाकडे मोर्चा वळत लाखो रुपयांचा माल चोरुन नेला आहे. चोरी सञ नियमीत सुरुच आहे.

पोलीसांचा वचकच राहिलेला असेच चिञ दिसत आहे. पोलीसांनी घटना स्थळी पहाणी केली आहे.दुपारी उशीरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
Visit : Policenama.com