भरदुपारी घरफोडी, साडेसात लाखांचे दागिने लंपास

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – एका शिक्षक दाम्पत्याने काटकसर करून खरेदी केलेले सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी भरदुपारी चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलठण येथे घडली. येथील काळुबाईनगरातील कृषीराज कॉलनीत कांचन व विठ्ठल मुळीक प्राथमिक शिक्षक दाम्पत्य राहते. त्यांच्या घराचे कुलूप भरदुपारी एक ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोडून दागिने पळविले.

चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले साडेसदतीस तोळे वजनाचे अंदाजे साडेसात लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरुन नेले आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील नागरिक चोरट्यांच्या भितीने धास्तावले आहेत. चोरट्यांनी डल्ला मारलेल्या दागिन्यांमध्ये दोन लाख रुपये किंंमतीच्या दहा तोळे वजनाच्या चार बांगड्या, एक लाख ४० हजार रुपये किंमतीचे सात तोळे वजनाचे जाड पट्टी असलेले सोन्याचे गंठण, २० हजार रुपये किंमतीचे डायमंडचे दोन वाट्या असलेले एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, ५० हजार रुपये किंमतीच्या अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठ्या, ४० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी एक तोळा वजनाच्या दोन सोनसाखळ्या, ३० हजार रुपये किंमतीचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे नेकलेस, ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, एक लाख ४० हजार रुपये किंमतीची प्रत्येकी एक तोेळ्याची अशी एकुण सात तोळे वजनाची सोन्याची सात कर्णफुले, ३० हजार रुपये किंमतीचे दीड तोळा वजनाची साखळीतील लंबोळी मण्याची बोरमाळ, ५० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सिंगल साखळीतील सोन्याचे लांब गंठण असा एकुण साडे सदतीस तोळे वजनाचा व सात लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ऐवजाचा समावेश आहे. कांचन विठ्ठल मुळीक (वय ४८, रा. मलठण) यांनी पोलिसांत चोरीची तक्रार दिली आहे.

बियर बारमध्ये पट्ट्याने मारहाण करून पोलीस पाटलाचा खून

शिक्षक दाम्पत्याने सोन्याचे दागिने घरातील अडगळीच्या ठिकाणी कोणाला संशयही येणार नाही अशा पध्दतीने वेगवेगळ्याा ठिकाणी ठेवले होते. मात्र याची सविस्तर माहिती असलेल्या कोणीतरी जाणकारानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ठसेतज्ञ किंवा श्­वानपथकाला याचा शोध घेता येवू नये या उद्देशाने सर्वत्र पाणी ओतून ठेवले होते.