भर दिवसा घरात शिरुन महिलेला धमकावून लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भर दिवसा घरात शिरुन एका चोरट्याने महिलेचे तोंड दाबून धमकावून तब्बल पावणे तीन लाखांचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. ही घटना बावधन येथील दगडे पाटील व्हिला, पाटीलनगर येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

याप्रकरणी चंद्रभागा उत्तम दगडे (वय ४८) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, दगडे या पाटील व्हिलामध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्या घरात असताना दुपारी अचानक एक जण घरात शिरला. त्यांनी त्यांचे तोंड दाबून आवाज केला तर मारुन टाकीन अशी धमकी दिली. दगडे यांच्या गळ्यातील, कानातील, हातातील व पायातील सोन्याचांदीचे दागिने असा २ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

या चोरट्याने अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट व ट्रॅक पँट घातली होती. रंगाने काळा, उंचपुरा असलेला या चोरट्याने तोंडाला रुमाळ बांधला होता. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like