पुण्यातील नगरसेविकेच्या घरात भरदिवसा धाडसी चोरी, ७.२५ लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नगरसेविकेच्या घरामध्ये चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करत सव्वासात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कानिफनाथ चौकाजवळ असललेल्या मुंगळे अण्णानगर येथील वस्तीवर मंगळवारी दुपारी घडली. हा प्रकार नगरसेविका अश्विनी भागवत यांच्या घरात घडला.

अश्विनी भागवत यांचे धनकवडी पोस्ट ऑफिसजवळ दुमजली घर आहे. चोरट्यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सव्वासात लाख रुपयांची रोकड चोरून नेली. अश्विनी भागवत यांचे पती सागर यांचे मित्र अमोल पाटील यांचे गुरुवारी लग्न आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सव्वापाच लाख रुपये सागर भागवत यांच्याकडे ठेवले होते. सागर यांच्या व्यवसायातील दोन लाख रुपये आणि पाटील याने दिलेले पैसे त्यांनी कपाटात ठेवले होते.

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अश्विनी भागवत या महापालिकेत जाण्यासाठी बाहेर पडल्या. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बाहेरुन जीना आहे. याचा फायदा चोरट्यांनी घेतला. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन कपाटात ठेवलेली रक्कम चोरून नेले. अमोल पाटील याने सागर यांना पैशांची मागणी केली.

त्यावेळी त्यांनी मुलीला सांगतो तू त्यांच्याकडून पैसे घेऊन जा असे सांगितले. वरच्या मजल्यावर पाहताच मुलीला कपाटातील ड्रावर उघडा दिसला. तसेच कपाटात पैसे नसल्याचे दिसले. मुलीने ही माहिती वडील सागर यांना देताच ते तात्काळ घरी आहेल आहे. त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्य़ाद दिली.

पोलिसांनी घराजवळील सीसीटीव्ही तपासले असता एका सीसीटीव्हीमध्ये एक मुलगा दोनच्या सुमारास त्यांच्या घरातून बाहेर येताना दिसत आहे. तसेच त्याच्या हातात पिशवी असल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

सिने जगत –
‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक