वाकड, थेरगावमध्ये चोरीचे प्रकार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

वाकड आणि थेरगाव येथे दोन ठिकाणी चोरीचे प्रकार घडले आहेत. वाकड येथील क्रोमा स्टोयर मधून एक अँपल कंपनीचा मोबाईल चोरीला गेला आहे. तर थेरगाव येथे राहते घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करून दोन लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत.

[amazon_link asins=’B07335K95J,B01ELJQSS8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad05b813-ba3b-11e8-a506-3fb679d9945f’]

रवींद्र कालिदास क्षिरसागर (२९, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) याने फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडे आकाराच्या सुमारास चोरट्यानी रवींद्र याचा ७९ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला.

इंदापूरात दुकान फोडून ७२ हजार रूपयांची चोरी

पुष्पा नामदेव मोरे (४५, रा. मातोश्री हॉस्पिटल जवळ, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ ते १३ सप्टेंबर दरम्यान राहते घराच्या उघड्या दरवाजा असताना कोणीतरी कपाटातील १२ तोळे वजनाचे दोन लाख २५ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वाकड पोलीस करत आहेत.

घर बसल्या नोंदविता येणार एफआयआर