दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला चोरट्याने लुटले

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला अडवून चोरट्याने त्यांच्या कडील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, बाराशे रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. एकंदरीत अशी जवळपास पस्तीस हजार रुपयांची लुट केल्याची घटना (9 नोव्हेंबर) रोजी रात्रीच्या वेळी 11 वाजता घडली.

बबन गंगाराम पवार यांच्या फिर्यादीवरुन आज्ञात आरोपी विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 9 नोव्हेंबर  रोजी बबन पवार आणि त्याच्या पत्नी हे दोघे दुचाकीवरून जात होते. दुचाकीवर जात असलेल्या बबन पवार यांच्या दुचाकीला चोरट्यांनी त्यांच्याकडील दुचाकी आडवी लावुन पवार दांपत्याकडील 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, बाराशे रुपये किमतीचा मोबाईल, पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

काही वेळातच लुटीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस कडून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. सदरच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाथरी सोनपेठ रोडवरील बाभळगाव फाट्याच्या पुढे दिड किलो मीटर अंतरावर हि घटना घडल्याचे कळते. पाथरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर बोधगीरे हे या घटनेचा तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com