सराईत गुंडाला दरोडा प्रतिबंधक पथकाकडून पिस्तूलासह अटक

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

 

कोथरुड परिसरातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४० हजार २०० रुपयांचे एक पिस्टल व एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास भुसारी कॉलनी येथे करण्यात आली.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ccafa70-b67e-11e8-98ed-87f1c3ac5b13′]

अक्षय साहेबराव ठेंबे (वय-२४ रा. इंदीरा शंकरनगरी, पौड रोड, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अक्षय ठेंबे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पुणे : मानलेल्या भावाकडूनच विवाहीत बहिणीवर बलात्कार 

दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस नाईक सचिन अहिवळे यांना सराईत गुन्हेगार अक्षय ठेंबे हा भुसारी कॉलनीत येणार असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार सापळा ठेंबेला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ४० हजार दोनशे रुपयांचे रुपयांची गावडी बनावटीची एक पिस्टल आणि एक जीवंत काडतुस सापडले. ठेबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45ddac68-b67e-11e8-aaf3-b784b4bac624′]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, एपीआय विद्युल्लता चव्हाण,पोलीस कर्मचारी यशवंत आंब्रे, शंकर पाटील, राहुल घाडगे, सचिन गायकवाड, सचिन अहीवळे, शैलेश सुर्वे, संदिप ठाकरे, विल्सन डिसोझा, अमाेल पवार, अजय थाेरात,बाबा चव्हाण
वैभव स्वामी यांच्या पथकाने केली.

जाहिरात