…तोपर्यंत सहकार्य ; रॉबर्ट वधेरा यांची फेसबुक ‘पोस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने गुरुवारी रॉबर्ट वधेरा यांची ९ व्यांदा चौकशी केली आहे. प्रारंभी सोशल मीडियावर वधेरा यांनी एक पोस्ट टाकताना आतापर्यंत मला ११ वेळा तपासयंत्रणेने बोलावले आणि सुमारे ७० तास चौकशी झाली आहे. मला न्याय पालिकेवर विश्वास आहे असे त्यांनी नमूद केले आहे. गुरुवारी ईडीच्या कार्यालयात जाताना वधेरा यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी – वधेरा याही होत्या.
robert

वधेरा यांच्या अवैध संपत्ती आणि जमीन विक्री प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. समन्स मिळाल्यानंतर वधेरा हे आज चौकशीसाठी हजर झाले. यापूर्वी फेब्रुवारीतही वधेरा यांच्यासह त्यांच्या आईचीही चौकशी करण्यात आली होती,त्यावेळीही प्रियंका गांधी – वधेरा याही उपस्थित होत्या. वधेरा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकताना जोपर्यंत माझ्यावरील आरोप खोटे ठरत नाही तोपर्यंत मी चौकशीला सहकार्य करत राहील असे स्पष्ट करून त्यासोबत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्रही अपलोड केले आहे.