राजकारणात येण्याबाबत राॅबर्ट वाड्रा यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – नुकतेच वाड्रा यांनी फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले होते. असे असतानाच मुरादाबादमध्ये युवक काँग्रेसकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘रॉबर्ट वाड्रा जी, मुरादाबाद लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी तुमचं स्वागत आहे. असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे वाड्रा आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या मैदानात उतरणार का, याबद्‍दल जोरदार चर्चा आहे. याविषयी स्वतः वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण प्रवेशाविषयी रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, ‘हो, मी याबाबत विचार करत आहे पण सध्या एवढी घाई नाही. मला प्रथम मला माझ्यावरील निराधार आणि बिनबुडाच्या आरोपांपासून  मुक्त व्हायचं आहे. लोकांना असा विश्वास वाटला पाहिजे की मी बदल घडवू शकतो.’
मला बदनाम करण्यासाठी कारस्थान-
एक दिवसापूर्वीच खुद्द वाड्रा यांनीच फेसबुक पोस्टद्वारे राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. याविषयी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली होती पोस्टमध्ये  त्यांनी म्हणले होते की, ‘मनी लाँडरिंगच्या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे. याप्रकरणी माझी सध्या चौकशी सुरु आहे. ही चौकशी संपल्यानंतर मी देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि त्यातही प्रामुख्याने उत्तर प्रदेशवासियांसाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.”, “गेल्या काही वर्षांपासून देशातील सरकार मला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचत आहे. परंतु त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. हे आरोप खोटे असल्याचे एव्हाना लोकांना समजले आहे. देशातील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे. अनेकांचा मला पाठिंबादेखील आहे. मी या लोकांचा ऋणी आहे.’
 सध्या त्यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाड्रा यांनी पोस्टमध्ये उत्तर प्रदेशबद्दल विशेष उल्लेख केला आहे.

Loading...
You might also like