×
Homeमहत्वाच्या बातम्या'त्या' एफआयआर प्रकरणी रॉबर्ट वधेरा यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

‘त्या’ एफआयआर प्रकरणी रॉबर्ट वधेरा यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अडचणीत सापडलेल्या उद्योगपती आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वधेरा यांनी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्टमधील (पीएमएलए) काही सेक्शनच्या घटनात्मक वैधतेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचलनालयाकडून नोंदवण्यात आलेला FIR रद्द करावा यासाठी त्यांनी दिली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

बिकानेर भूखंड घोटाळा प्रकरण

बेकायदा पद्धतीने परदेशात संपत्ती निर्माण केल्याचा आरोप रॉबर्ट वढेरा यांच्यावर आहे. अंमलबजावणी संचलनालयाने रॉबर्ट वधेरा यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यान्वये प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. मागील महिन्यात बिकानेर भूखंड घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वधेरांना मोठा धक्का देताना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) त्यांच्या कंपनीची ४.६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या जमीन कराराशी संबंधित प्रकरणात राजस्थान पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राच्या आधारे ‘ईडी’ने २०१५ मध्ये गुन्ह्याची नोंद केली होती.

या जमिनीच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याची तक्रार बिकानेरच्या तहसीलदारांनी नोंदविल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. हा भूखंड भारत आणि पाकिस्तान सीमेला लागून असल्यामुळे अतिशय संवेदनशील मानला जात आहे. ‘ईडी’ने मागील महिन्यात जयपूरमध्ये वधेरा आणि त्यांच्या आई मौरीन यांची चौकशी केली होती. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि वधेरा यांच्या पत्नी प्रियांका गांधी यासुद्धा चौकशी कार्यालयात त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

Must Read
Related News