म्हणून ‘रॉबर्ट वाड्रा’ यांनी परदेशात जाण्यासाठी मागितली परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकलेले काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांना आतड्यांचा ट्युमर झाल्याची माहिती आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्लीच्या कोर्टात मेडिकल सर्टिफिकेट जमा केले आहे. त्यामध्ये ट्युमर बाबतची माहिती देण्यात आली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या मेडिकल सर्टिफिकिटमध्ये आपल्या आतड्यांमध्ये ट्युमर झाला आहे. त्याच्या उपचारासाठी लंडनमध्ये जाण्याची परवानगी मागितली आहे. यापूर्वी वाड्रांनी विदेशात जाण्यासाठी ईडीकडे परवानगी मागितली होती. उपचारासाठी लंडनला जाण्यासाठी बुधवारी वाड्रांनी न्यायालयाकडे आपला पासपोर्ट परत मागितला. तर दिल्ली कोर्टात या प्रकरणी तीन जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विदेशात उपचारासाठी जाण्यासाठी वाड्रांनी दिल्लीच्या गंगाराम इस्पितळातील मेडिकल सर्टिफिक जमा केले आहे.

रॉबर्ट वाड्रा यांची पुन्हा ईडीकडून चौकशी
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे पुन्हा अंमलबजावणी संचलनालयाच्या चौकशीचा ससेमीरा लागला आहे. त्यांना ईडीने यासंदर्भात नोटीस बजावली असून गुरुवारी (दि. ३०) त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र पुन्हा दिल्ली एनसीआर, बिकानेर आणि इतर मालमत्तांप्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूकीपुर्वी रॉबर्ट वाड्रा यांची दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन क्वेअरच्या प्रकरणात बेनामी मालमत्तेसंबंधी चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी तीन दिवस चालली होती. ७ फेब्रुवारी रोजी ईडीकडून ६ तास चौकशी केली होती. या चौकशीत त्यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान त्यांच्याकडे याप्रकरणी ई-मेल आणि कागदपत्रांची विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची दिल्ली, एनसीआर, बिकानेर येथील जमीनींचे व्यवहार आणि इतर मालमत्ता याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. गुरुवारी चौकशी करण्यात येणार असल्याबाबत वाड्रा यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

You might also like