रॉबर्ट वढेरांच्या राजकिय प्रवेशावर भाजप नेत्याची “ही” प्रतिक्रिया  

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या उत्तरप्रदेशच्या राजकारण सक्रिय झाले असून , तेथील राजकारणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे राजकारणात येत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. त्यात युवक काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथून निवडणूक लढवणार असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपले मत व्यक्त करत रॉबर्ट वढेरा यांच्यावर टीकाही केली आहे.

राजकीय सर्कशीत जोकरचाच प्रवेश बाकी होता, आता तोही दिसत आहे, अशा शब्दांत अब्बास नक्वी यांनी टोला लगावला आहे. मुरादाबाद लोकसभा मतदारसंघात वढेरांच्या उमेदवारीबाबत युवक काँग्रेसने पोस्टर्स लावले आहेत. रॉबर्ट वढेराजी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तुमचे स्वागत आहे, असं नक्वी यांनी पोस्टरवर म्हटलं आहे.

रॉबर्ट वढेराजी मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयाचे स्वागत आहे. हे पी-आर (प्रियंका – राहुल) राजकीय सर्कस आहे. या पी-आर राजकीय सकर्शीत जोकरचाच प्रवेश राहिला होता. आता जोकरचा प्रवेशही दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मुरादाबाद येथे लावण्यात आलेल्या वढेरांच्या पोस्टरवर यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे छायाचित्र लावण्यात आले. या पोस्टरनंतर मात्र वढेरा हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा होत आहे. परंतू, वढेरा यांनीही आपल्या फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. या पोस्टमध्ये उत्तर प्रदेशात काम करण्याचा आपला अनुभव चांगला आहे. आपल्यावरील सर्व आरोप संपुष्टात आल्यानंतर लोकांच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1099863292179345409

https://twitter.com/ANI/status/1099903711697162240