अष्टाणे गावातील कृषी केंद्र फोडुन लाखों रुपयांची बी,बीयाणे लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून पेरणीला सुरवात केली आहे. बीयाणे, खतांना मागणी वाढली आहे. अशाच वेळी तालुक्यातील साक्री जवळील अष्टाणे गावातील सचिन देवरे यांच्या मालकीचे ओम कृषी केंद्र बी बियाणे, खताचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील बी-बीयाणे, खते यांची पाकिटे असा अंदाजे दिड लाखांचा माल चोरुन नेला. हि बाब सोमवारी सकाळी दुकान मालक देवरे दुकान उघडण्यासाठी आले असता,  दुकानाची कुलपे कडी कोयंडा तोडून लाकडी फळी वाकवलेली त्यांनी दिसली. हे पहाताच चोरी झाल्याचे लक्षात आले.

दुकानातील खताची पाकिटे बीयाणे पाकिटे असा दिड लाखांचा माल चोरुन नेला. चोरी बाबत साक्री पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी केली. तपास कामी फिंगर प्रिंट तज्ञ व श्वान पथकाची मदत घेण्यात आली. चोरी प्रकरणी साक्री पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द सचिन देवरे यांनी दिलेल्या लेखी तक्रार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. देविदास ढुमणे करत आहे.

जाणून घ्या आरोग्यवर्धक ‘जवसाचे’ फायदे

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

धनंजय मुंडें यांच्या अडचणी वाढ ; वंचितकडून ‘हा’ नेता निवडणुकीच्या रिंगणात

जायरा वसीमच्या बॉलीवूड सोडण्याच्या निर्णयावर तसलीमा नसरिनने दिली प्रतिक्रिया

‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना ‘समन्स’ जारी