‘रॉबिन उथप्पा’नं मोडला नियम, बंदी असूनही चेंडूवर लावली ‘लाळ’, Video ‘व्हायरल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोलकाता नाइट राइडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉबिन उथप्पा नवीन विवादात अडकल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे त्यात उथप्पा चेंडूला लाळ लावताना दिसत आहेत. हा प्रकार कोलकाताच्या डावातील तिसर्‍या ओव्हरमध्ये घडला. त्यावेळी उनाडकट गोलंदाजी करीत होते. सुनील नरेन समोर होते. नरेनचा एक शॉट थेट रॉबिनकडे गेला आणि त्यांनी झेल सोडला. झेल सोडल्यानंतर त्यांनी चेंडू उचलला आणि त्यावर लाळ लावली.

होऊ शकते ही शिक्षा

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर क्रिकेट संदर्भात काही नवीन नियम लागू झाले आहेत. यापैकीच एक नियम म्हणजे कोणत्याही खेळाडूने चेंडूला लाळ चोळू नये. जर एखादा खेळाडू असे करताना आढळला तर त्याला 50 टक्के दंडासह 1-2 सामन्यातून निलंबित देखील केले जाऊ शकते.

राजस्थानचा या मोसमातील हा पहिला पराभव आहे, तर कोलकाताने त्यांच्या तीन सामन्यांपैकी दुसरा सामना जिंकला आहे. दरम्यान केकेआरचे सुपरस्टार सलामीवीर सुनील नरेन तिन्ही सामन्यात आपली छाप सोडू शकलेले नाहीत. त्याचवेळी केकेआरची मधली फळीही स्कोअर करण्यात कमी पडत आहे.