माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरील ‘रॉबिनहुड बिहार’ के गाण व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पांडे कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबद्दलची चर्चा सुरू असतानाच त्यांच्यावरील एक गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. रॉबिनहुड बिहार के असे या गाण्याचे बोल आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचं नाव चर्चेत आले होते. विशेषतः मुंबई पोलीस व अभिनेत्री रिया चक्रवर्तीबद्दल पांडे यांनी केलेल्या विधानावरून ते मीडियामध्ये झळकले होते. गुप्तेश्वर पांडे यांची बिहारमध्ये लोकप्रियता वाढत आहे. पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर लगेच रॉबिनहुड बिहार के हे गाणे यू ट्यूबवर रिलीज करण्यात आले. हे गाण बिग बॉसमधील स्पर्धक दीपक ठाकूर यांनी तयार केले असून, त्याला प्रेक्षकांची पसंती दिली आहे. गुप्तेश्वर पांडे यांची गुन्हेगारांवर कशी वचक होती, हे गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाण्याला निखिल शांतनु यांनी संगीत दिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like