भारत-पाक सीमेवर रोबोट तैनात ; दगडफेक करणाऱ्यांसह आतंकवाद्यांची झोप उडणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्करात दररोज नवनवीन तंत्रज्ञान समाविष्ट होत आहे. राफेल विमान तसेच अपाचे फायटर हेलिकॉप्टर नंतर आता आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात अत्याधुनिक रोबोट युक्त रणगाडे, त्याचप्रमाणे फायटर विमाने उडवणारे रोबोट यांचा लष्कराच्या ताफ्यात समावेश होणार आहे. हे रोबोट प्रामुख्याने भारत – पाक सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.

या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग भारतीय सैन्य काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी करणार आहे. हे रोबोट्स त्यांना आवरण्याबरोबरच त्यांच्याशी दोन हात देखील करू शकतील. यासाठी एक -दोन नव्हे तर चक्क ५०० रोबोट्स तैनात करण्यात येणार आहेत. हे रोबोट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर काम करतील. हे रोबोट्स लवकरात लवकर तैनात करण्याविषयी भारतीय लष्कर गंभीर विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ग्रेटर काश्मीर मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तात या संबंधी हवाला देण्यात आला आहे.