Robotic Arm | 17 वर्षांच्या मुलाने बनविला मनाने नियंत्रित करता येणारा रोबोटिक आर्म; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Robotic Arm | अमेरिकेतील १७ वर्षीय बेंजामिन चोई याने एक अफलातून शोध लावला आहे. त्याने मनाने नियंत्रित करता येणारा रोबोटिक आर्म (Robotic Arm) कमी खर्चात तयार करून जगाला धक्का दिला आहे.

 

जगात वेगवेगळे शोध लावणार्‍यांची कमी नाही. दररोज आपल्याला काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळे पाहायला मिळते. हे पाहून जगभर त्या गोष्टीची चर्चा होते. असाच एक प्रकार अमेरिकेतील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने केला. बेंजामिन चोई (Benjamin Choi) नावाच्या एका विद्यार्थ्याने एक अनोखा आविष्कार घडवला आहे. चोईने एक रोबोटिक आर्म (Robotic Arm) तयार केला आहे. त्याची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या रोबोटिक आर्मच्या किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. या रोबोटिक आर्मला मेंदूद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते.

 

बेंजामिन या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याला ६० मिनिटांचा एक अमेरिकन टीव्ही कार्यक्रम पाहून रोबोटिक आर्म तयार करण्याची कल्पना सुचली. त्यात संशोधकांनी रुग्णाच्या मेंदूत छोटे सेन्सर्स टाकले, जेणेकरून रुग्ण आपल्या मेंदूने त्या रोबोटिक आर्मला नियंत्रित करू शकेल.

 

स्मिथसोनियन मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत बेंजामिनने सांगितले की, या तंत्राने तो खूप प्रभावित झाला आहे. पण त्यासाठी अत्यंत जोखमीच्या ओपन ब्रेन सर्जरीची गरज असल्याने तोही अस्वस्थ झाला होता.

रोबोटिक आर्म कसे तयार करावे (How To Build A Robotic Arm) ?:
बेंजामिन याला आपल्या अभ्यासादरम्यान यंत्रमानव तयार करून कोडींग करण्याचा अनुभव आधीच आला होता.
रोबोटिक आर्मचे लहान तुकडे करण्यासाठी त्याने आपल्या बहिणीच्या थ्रीडी प्रिंटर आणि फिशिंग लाइनचा वापर केला.
मग ते सर्व भाग एकत्र बांधले गेले. हात बळकट व टिकाऊ व्हावा म्हणून तो अभियांत्रिकी-श्रेणीच्या अ‍ॅक्सेसरीजपासून बनविला. चार टन वजन सहन करू शकेल.

 

रोबोटिक आर्मची वैशिष्ट्ये (Features Of Robotic Arm) :
या रोबोटिक आर्मची एक खास गोष्ट म्हणजे ती आर्टिफिशियल इंटेलिजेंस अल्गोरिदमचा
(Artificial Intelligence Algorithm) वापर करून युजरच्या मनाच्या लहरींशी संवाद साधू शकते.
यामध्ये वापरण्यात येणार्‍या इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी तंत्राद्वारे मेंदूच्या विद्युतीय क्रियेची नोंद होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Robotic Arm | 17 year old student made robotic hand can be controlled with brain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Home Remedy For Back Pain Treatment | पाठदुखीवर रामबाण उपाय ! आरामासाठी ‘हे’ घरगुती उपाय वापरा

 

Home Remedy For Asthma | दम्यावर आराम देऊ शकतात ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

 

Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या