‘कोरोना’नंतर रोबोट नोकर्‍या खाणार, तब्बल 85 दशलक्ष कर्मचार्‍यांवर घरी बसण्याची वेळ

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या संकटामुळे आधीच करोडो लोकांच्या नोक-या, रोजगार गेल्याने त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. असे असताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे उणीव भासत असल्याने मोठमोठ्या कंपन्यांनी ऑटोमोशनला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरातील 85 दशलक्ष नोक-या (robots-will-take-your-jobs-85-million-jobs) संपुष्टात येणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World Economic Forum WEF) केलेल्या पहाणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मध्यम ते मोठ्या कंपन्यांनी पुढच्या पाच वर्षात त्यांचे काम रोबोटद्वारे करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. जगातील मोठमोठ्या 300 कंपन्यांचा अभ्यास केला आहे. या कंपन्या त्यांचे काम डिजिटलायझेशन आणि नवीन ऑटोमोशनवर हलविण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्याच्या कर्मचा-यांना या नवीन प्रणालीवर काम करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, स्कील्स आत्मसात करावे लागणार आहे. यासाठी त्यांना पैसाही खर्च करावा लागणार आहे.हा एक प्रकारे कोरोना संकटाचा साईडईफेक्टच आहे. हा अहवाल अशावेळी आला आहे.जेंव्हा या कंपन्याेचे लाखो कर्मचारी घरातून काम करूनही कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागली होती, असे wion ने म्हणले आहे.

अमेरिकेच्या कामगार विभागाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत नोकरी गेलेल्यांनी केलेल्या अर्जांची संख्या गेल्या सात आठवड्यातील उच्चांकी असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात 898.000 च्या उच्चांकावर पोहचले. यात 53 हजार वाढ झाली असून ही वाढ खूप मोठी असल्याचे म्हटले आहे.

कंपनी डेटा एंट्रीच्या कामासाठी कर्मचा-याऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने रोजगार निर्मीती ठप्प आणि नोकरी नष्ट होत असल्याचे अवहालात म्हटले आहे. दुसरीकडे कृत्रीम बुध्दीमत्तेमुळे ( एआय) 97 दशलक्ष नोक-या उपलब्ध होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.