बगदादमधील अमेरिकी एअरबेसवर ‘रॉकेट’ हल्ला, इराणकडून ‘पलटवार’ !

बगदाद : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आखाती खाडीत तणाव वाढत चालला आहे. शनिवारी रात्री इराकची राजधानी बगदादमधील सर्वात सुरक्षित परिसर म्हटल्या जाणाऱ्या ग्राीन झोन आणि अमेरिकी एअरबेसवर रॉकेट हल्ला झाला आहे. शुक्रवारी बगदादमध्ये टॉप कमांडर कासिम सुलेमानी याचा अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात मृत्यु झाला होता. त्यानंतर इराणने पलटवार करुन हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

ग्रीन झोनमध्ये दोन रॉकेट मोटारीवर आणि अमेरिकी एअरबेसवर दोन रॉकेट असे चार रॉकेटचा हल्ला करण्यात आला. इराक सेनेकडून याबाबत सांगण्यात आले की, ग्रीन झोनमधील एक्लेव परिसरात एका मोटारीवर तर दुसरे रॉकेट त्याच्या जवळ फुटले. त्यानंतर बगदादच्या उत्तरेकडील एअरबेसवर दोन रॉकेट डागण्यात आली होती.

या हल्ल्यानंतर लगेचच एअरबेसच्या चारही बाजूला ड्रोन उडत असल्याचे दिसून आले. अमेरिकी दुतावास आणि इराकमध्ये जवळपास ५ हजार २०० अमेरिकन सैनिक तैनात आहेत. त्यांना गेल्या काही महिन्यात अनेक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक हल्ल्याला अमेरिका इराणला जबाबदार धरत असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/