टेरेसवर टेनिस खेळणार्‍या मुलींना रॉजर फेडररनं दिलं ‘सरप्राइझ’

रोम : वृत्तसंस्था – लॉकडाउनमुळे दोन इटलीच्या मुली घराच्या छतावर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. इटलीच्या लिगुरियामध्ये 13 वर्षाच्या व्हिटोरिया आणि 11 वर्षाच्या कॅरोलाला भेटण्यासाठी टेनिस दिग्गज रॉजर फेडररने सरप्राइज दिले.

फेडररने व्हिडीओ पोस्ट करत दोन्ही मुलींसोबत टेनिस खेळताना दिसत आहे. या मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलींना सरप्राइज देत फेडरर त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी आला. फेडररला पाहून मुली खूप खूश झाल्या. प्रोफेशनल टेनिस असोसिएशनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. टेनिस खेळल्यानंतर फेडरर मुलींबरोबर जेवताना दिसत आहेत. टेरेसवर टेनिस खेळल्यानंतर फेडरर म्हणतो की मी जगभर टेनिस खेळलो आहे, मात्र या मुलींबरोबर टेरेसवर टेनिस खेळणे ही एक वेगळी गोष्ट आहे. अशा प्रकारे खेळून आम्ही जगाला सांगत आहोत की कोणत्याही वातावरणात टेनिस खेळू शकता. रॉजर फेडररने या मुलींना आणखी एक सरप्राइज देणार आहे. या मुलींना राफेल नदालच्या टेनिस अकादमीमध्ये प्रवेश दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like