Video : लग्नाच्या एका महिन्यानंतर रोहनप्रीतला लोकांनी केलं ट्रोल ! पत्नी नेहा कक्करवरून मारले ‘टोमणे’

पोलीसनामा ऑनलाइन – फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि. 24 ऑक्टोबर (शनिवार) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अलीकडेच नेहा तिचं हनिमून एन्जॉय करून पुन्हा कामावर परतली आहे. नेहा इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये जज आहे. लग्नाच्या एका महिन्यानंतर नेहाचा पती रोहनप्रीत सिंह सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

सध्या रोहनप्रीतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशलवर व्हायरल होत आहे. यात रोहनप्रीत मुंबईमधील एका सलून बाहेर स्पॉट झाला आहे. व्हिडिओत रोहनप्रीत फोटोग्राफर्सला हाय हॅलो करताना दिसत आहे. यानंतर तो सलूनमध्ये जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रोहनप्रीत ट्रोल होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. लोक त्याला नेहाचा पती म्हणून बोलत आहेत.

या व्हिडिओवर अनेक यूजर्सनं कमेंट केल्या आहेत. परंतु सर्वांनी त्याला नेहाचा पती म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बहुतेक यूजर्सनं कमेंट करताना त्याला उल्लेख उपरोधिकपणे नेहाचा पती असाच केला आहे आणि त्याला टोमणे मारले आहेत.