Rohini Khadase | भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? OBC नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC reservation) राज्यात सत्ताधारी आणि भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर यावरून (Leader of Opposition Devendra Fadnavis) राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंनी (Rohini Khadse) भाजपवर टीका केली आहे. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे ट्विट खडसे यांनी केले आहे. तसेच खडसेंनी भाजपसह फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असे म्हणत भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले. मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले आहे. फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाबाबत संताप व्यक्त केल्यानंतर रोहिणी खडसेंनी भाजपला सवाल केला आहे.

दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ( BJP spokesperson Keshav Upadhyay) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या अपयशामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Builder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत

Aadhaar Card and SIM Card | एका आधार कार्डवर किती सिम कार्ड्स आपण घेऊ शकतो? जाणून घ्या

पोलीसांनी प्रेमीयुगलांना बसमध्ये नको ‘त्या’ अवस्थेत पकडलं, अन्…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Rohini Khadase | who ended obc leadership rohini khadase questioned to bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update