Rohini Khadse । ‘आता, पेट्रोलही 105 वर थांबेल’ ! असं का म्हणाल्या रोहिणी खडसे

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनामूळे पडलेल्या टाळेबंदीमुळे आधीच सर्व नागरिक हतबल झाले आहेत. त्यात वाढती महागाई तसेच इंधनाच्या दराच्या भडक्यामुळे सामान्यांची होरपळ होत आहे. पेट्रोलच्या किंमतीने (Petrol price) शंभरचा टप्पा ओलांडला आहे. या इंधनाच्या दरवाढीवरून देशातून मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. सध्या पेट्रोलची किंमत (Petrol price) 105 पर्यंत पोहचली असताना या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. now petrol will also stop 105 rohini khadse slammed bjp and devendra fadanvis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

रोहिणी खडसेंनी (Rohini Khadse) ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की, ‘अरे पेट्रोल पण पोहोचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल ते.. असं म्हणत रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात भाजपा आमदारांच्या संख्याबळाएवढा पेट्रोलचा प्रति लिटरची किंमत आहे, या मुद्यावरून रोहिणी खडसेंनी भाजपला (BJP) टोला लगावला आहे.
तर, रोहिणी खडसे (Rohini Khadse) या सातत्याने भारतीय जनता पक्षावर ट्विटच्या माध्यमातून टीका करीत असतात.
याअगोदर देखील ओबीसी आंदोलनाच्या विषयावरून त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली होती.

ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असं म्हणत भाजपाकडून (BJP) तीव्र आंदोलनाचा इशाराच देण्यात आला होता.
यावरून रोहिणी खडसेंनी देखील भाजपला (BJP) टोला लगावला होता. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?.
आता गळा काढण्यात अर्थ नाही, असं रोहिणी खडसेंनी ट्विटद्वारे म्हटलं होतं.

पेट्रोल दरवाढीनंतर (Petrol price) दिल्लीत आज पेट्रोल (Petrol price) 99.16 तर, डिझेल (Diesel price) 89.18 रुपये प्रती लीटर वर पोहचले आहे.
दरम्यान मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 105 रुपयांवर पोहचली आहे.
तर भाजपाने झालेल्या विधानसभा निवडणुकीत 105 विजयी आमदार निवडून आणले होते.
राज्यातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष ठरला होता.
परंतु, तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सत्तेत आल्याने भाजपाला (BJP) सत्तेपासून दूर राहावे लागले. यावरून अरे पेट्रोल पण पोहोचले की 105, बहुधा आता तिथंच थांबेल असा खोचक टोला रोहिणी खडसेंनी भाजपाला (BJP) लगावला आहे.

Web Title : Rohini Khadse । now petrol will also stop 105 rohini khadse slammed bjp and devendra fadanvis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune-Ahmednagar Highway Accident | मुंबईत मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये सोडून येताना भीषण अपघात; औरंगाबादच्या 2 शिक्षकांचा मृत्यू