Rohini Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Rohini Khadse | भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ हाती बांधलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मुलगी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या फोरव्हिलर वाहनांवर (Car) अज्ञातांनी हल्ला (Attack On Vehicles) केला आहे. ही घटना काल (सोमवारी) रात्रीच्या दरम्यान घडली आहे. रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना तेथील काही अज्ञातांनी दगडफेक केला. या हल्ल्यामुळे जळगावातील (Jalgaon News) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

2 मोटार सायकलवर आलेल्या 4 अज्ञातांनी रोहिणी खडसे यांच्या वाहनांवर दगडफेक केली. यानंतर त्या अज्ञातांनी परत रॉडने वाहनावर हल्ला केला. यावेळी चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केल्याने रोहिणी खडसे (Rohini Khadse) आणि चालक सुखरूप बचावले. असं खडसे कुटुंबीयांनी सांगितलं आहे. हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्या विरोधात आवाज उठविला होता. त्यातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बोदवड नगरपंचायत निवडणुकीनंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच ‘महिलांना कोणी त्रास देणार असेल तर चोप दिल्या शिवाय सोडणार नाही,’ अस विधान रोहिणी खडसे यांनी केलं होतं. तर ,त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे राजकारण चांगलंच गरम झालं आहे.

Web Title : Rohini Khadse | attack on ncp leader eknath khadse daughter rohini khadse car at jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर