Rohini Khadse | रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Rohini Khadse | राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse) यांच्यावर काल (सोमवारी) प्राणघातक हल्ला (Attack) केला. रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना तेथील काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर आता रोहिणी खडसे यांनी या हल्ल्याबाबत खुलासा केला आहे.
रोहिणी खडसे यांनी सांगितलं की, ‘3 दुचाकीवरून 7 जण आले यातील 3 जण हे शिवसेनेचे (Shiv Sena) पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले. एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या, ‘हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. परंतु मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे.
अशीच कायम उभी राहीन. तसेच राजकीय वैमनस्यातून, वादातून शिवसेना पदाधिकार्यांनी हा हल्ला केला.
तर, हल्ला करणार्यांची नावेही यावेळी रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सांगितली आहेत.
यात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील (Sunil Patil), पंकज कोळी (Pankaj Koli) व छोटू भोई (Chhotu Bhoi)
या 3 शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Web Title :- Rohini Khadse | eknath khadse daughter rohini khadse big allegation shiv sena office bearers attacked myself
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update