रोहित शर्माच्या मुलीनं चक्क जसप्रीत बुमराहच्या अ‍ॅक्शनची केली हुबेहुब ‘नक्कल’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक क्रिकेटवरही वाईट परिणाम झाला आहे. जगातील सर्व क्रिकेट सामने आणि स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अश्या वेळी टीम इंडियाचे काही खेळाडू घरी राहून कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माच्या मुलीने बुमराहच्या गोलंदाजीच्या कृतीची नक्कल करत चेंडू टाकला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

वास्तविक, जसप्रीत बुमराहने समायराचा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘मला वाटते ती माझ्यापेक्षा चांगली कामगिरी करते रोहित शर्मा आणि रितिका सजदेहपेक्षा ! मी सुरक्षितपणे म्हणू शकतो की, तिच्यापेक्षा मी तिचा खूप मोठा फॅन आहे … दरम्यान, या व्हिडिओमध्ये रोहितची पत्नी रितिका समायराला म्हणते – सांग बूम- बूम कसे चेंडू फेकतात. यानंतर, समायरा आपला हात उंच करून बुमराहच्या बॉलिंग करण्याच्या पद्धतीची कॉपी करण्याचा प्रयत्न करते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा इन्स्टाग्रामवर लाइव्ह होते आणि बार करत होते. दरम्यान, ऋषभ पंतने रोहित शर्मा यांना आव्हान देत म्हटले की, या वेळी कोण लांब षटकार मारतो हे पाहूया. त्याला उत्तर देताना हिटमॅनने आपल्याच शैलीत असे सांगितले की, पंतला संघात येऊन एक वर्ष झाले आहे आणि तो मला षटकार मारण्यास आव्हान देत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like