Rohit Patil | ‘पवार कुटुंबातील आवडता नेता कोण? शरद पवार की अजित पवार?’ रोहित पाटील यांचे खुमासदार उत्तर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी थोडकेच आणि हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखे तरुण नेते आणि राजकारणी आहेत. त्यात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांचे नाव येते. एका ठिकाणी रोहित पाटील (Rohit Patil) यांना अडचणीत टाकणारा एक प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी त्या प्रश्नाचे खुमासदार आणि सराईतपणे उत्तर दिले आहे.

एका डिजीटल प्लॅटफॉर्मवरील मुलाखतीत रोहित पाटील गेले होते. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तरे दिली. मुलाखतकाराने त्यांना अडचणीत टाकणारा आणखी एक प्रश्न विचारला. तुम्हाला पवार कुटुंबातील शरद पवार (Sharad Pawar) हे नेते आवडतात की, अजित पवार (Ajit Pawar). या प्रश्नावर रोहित पवारांची थोडा वेळ दमछाक उडाली. पण त्यांनी खुबीने म्हंटले, शरद पवारांना देखील एका मुलाखतीत असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता. ठाकरे कुटुंबातील दोन नेत्यांपैकी त्यांना कोणता नेता आवडतो. त्यावर त्यांनी ठाकरे कुटुंब असे उत्तर दिले होते. तुम्ही दिलेल्या दोन पर्यायातील दोनही माझे आवडते नेते आहेत. त्यामुळे मी देखील पवार कुटुंबिय असेच म्हणणार आहे. त्यातील कोणतेही एक नाव तुम्ही विचारणार असाल, तर शरद पवार हे माझे नाव असेल, असे रोहित पवार (Rohit Patil) म्हणाले.

रोहित पवार यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) कवठे महांकाळमधून
उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कुठे काम करायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हंटले की, आपण कुठे काम करायचे हे स्वत: ठरवू शकत नाही. जनता ते ठरवत असते.
तरी देखील तुम्ही विचारत आहात तर मला राज्यात काम करायला आवडेल, असे रोहित पवार म्हणाले.

Web Title :-  Rohit Patil | ajit pawar or sharad pawar who is favorite leader ncp youth leader rohit pawars answer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांनाच कामाला लावले, काही लोक शेतकऱ्यांच्या बांधावर…’ – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

Tata Airbus | टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधार्‍यांचीच विरोधकांना धमकी, ‘या’ नेत्यांची नार्को टेस्ट करा, सर्व गुपिते समोर येतील