Ajit Pawar | अजित पवारांचा अर्ध्या रात्री रोहित पाटलांना फोन, म्हणाले – ‘ऑक्सिजन टँकर पाठवलाय, तू स्वतः थांबून तो उतरून घे’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar |राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राणही गमवावा लागत आहे. मात्र, अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar | ) केवळ एका फोननंतर राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेली ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री साडेबारा वाजता रोहित पाटीलांना फोन केला. रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरून घे, असे पवारांनी सांगितले. पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहितने मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरून घेतला. त्यांनतर यातील 23 जंबो टाक्या व 2 डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा दाखल झाले.

तासगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढल्याने आमदार सुमन पाटील,
रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करून दिले आहेत.
मात्र राज्यभरात रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे.
तासगावतही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत असल्याने ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून घ्यावा,
अशी मागणी रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती. अखेर काल मध्यरात्री पवारांनी रोहित यांना फोन केला.
पवारांच्या सुचनेनंतर रोहित स्वतः भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरून घेतला आहे.

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण