Rohit Pawar | ‘#जी’ वरून चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहित पवार यांच्यात रंगलं ट्वीटरवॉर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतच एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी ‘जी’ शब्दाचा वापर केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक शब्दात बावनकुळेंवर टीका केली आहे. यासंबंधीचे ट्वीट करत त्यांनी बावनकुळेंवर निशाना साधला आहे. (Rohit Pawar)

गेले काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण महापुरूषांच्या बदनामीमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरू आहेत. नुकतच राज्याच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक आहेत असे वक्तव्य केले होते. त्यावरून सत्ताधारी भाजपकडून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे या प्रकरणाला एक नवे वळण लागले आहे. (Rohit Pawar)

जितेंद्र आव्हाडांवर माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख आदरार्थी औरंगजेब ‘जी’ असा केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) ट्वीट करत बावनकुळेंना प्रश्न विचारला आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, ‘राज्यपाल, मंत्री, आमदार, केंद्रीय प्रवक्ते यांच्या महापुरूषाबद्दलच्या अवमानकारक वक्तव्यांबाबत भाजप गप्प होती. पण अजितदादांनी स्वराज्यरक्षक म्हटल्यावर राज्याच्या अस्मितेबाबत नेहमीच सायलेंट असणारे भाजपचे मास्टरमाईंड राजकारणासाठी ऍक्टिव झाले आणि त्यांचे आदेश येताच भाजप बोलू लागली. आता बावनकुळेजींच्या वादग्रस्त वक्तव्यावर आंदोलन करण्याचे आदेश भाजपचे हेच मास्टरमाईंड देतील का? आणि त्यांनी दिलेल्या Standard Operating Procedure (SOP) नुसार बावनकुळे #जीं च्या फुली मारलेल्या फोटोला भाजप #जोडे_मारो आंदोलन करेल का? असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून रोहित पवारांनी विचारला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे.
त्यांनी त्यात लिहलं आहे की, ‘क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे
प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले.
अशा नीच क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही.
औरंग्या तो पापी औरंग्याच!’ अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून नोंदवली.

Web Title :- Rohit Pawar | A Twitter war broke out between Chandrasekhar Bawankule and Rohit Pawar over ‘#G’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ मागणीला योगी आदित्यनाथ यांची तत्वत: मान्यता, दिले अयोध्या भेटीचे आमंत्रण

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाची गळती थांबविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात…