रोहित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली आहे. त्यावर नातू रोहित पवार यांनी शरद पवार निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं आवाहन केले. रोहित फेसबुक पोस्टद्वारे शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं म्हटलं आहे. तर ज्यांच्यासाठी शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली ते पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवणार आहेत.

रोहित यांच्या या पोस्टवर त्यांनी आपले मत मांडले आहे, मी फक्त फेसबुक पोस्ट टाकली आहे, जो काही निर्णय घ्यायचा तो पवार साहेबांनी घ्यायचा आहे. मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या निर्णयाने वाईट वाटले. पवार साहेबांवर कुठलाही दबाव नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे सांगत असताना रोहित यांनी पार्थ पवार यांना लोकसभेसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सल्लाही दिला आहे. पार्थ पवारने आता लोकांशी संवाद साधायला हवा,  लोकांमध्ये जावे, त्यांचे काम करावे, असा सल्ला रोहितने पार्थला दिला.

लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. छोट्यात छोटा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. शेवटी तोच आपला विचार, साहेबांचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवत असतो. लोकांच्या अडीअडचणी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे छोटा कार्यकर्ता आणि लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. या संवादाच्या माध्यमामातून ज्या अडचणी असतील, त्या पुढे जाऊन निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी इच्छा मी व्यक्त करतो, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

ह्याही बातम्या वाचा –

शिरुर लोकसभा मतदरासंघ : कोल्हेमुळे आढळरावांचा विजयाचा मार्ग खडतर

लोकसभेचं समरांगण : राज्यात दलित-मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होतेय

कागदपत्र गायब करण्याचा सरकारचा फॉर्म्युला : सुप्रिया सुळे

“सुजय विखेंचा निर्णय योग्यच ; एक दिवस कुटुंबालाही पटेल”

उमेदवाराचे छायाचित्र देतानाच चिन्ह हटवायला हवे होते