Rohit Pawar | ‘2024 नंतर शरद पवार, अजित पवार मार्गदर्शन करतील पण निर्णय…’ – रोहित पवार

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | 2024 नंतर राजकारणाची समीकरणे बदलणार असून नवीन पिढीलाच निर्णय घावे लागणार आहेत. तसेच, आपण फार पुढचा विचार करून राजकारणात आलो आहोत, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे. ते जुन्नर (Junnar) येथील सभेत बोलत होते.

 

काम आणि पदांचे निर्णय नवीन पिढीचे
2024 नंतरचा काळ हा युवकांचा असून ती वेळ आमची आहे. 2024 ला सर्वासोबत राहून आपल्या विचारांचे सरकार कसे येईल? यासाठी मनापासून काम करायचे आहे. जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा निर्णयदेखील आपल्यालाच घ्यावे लागतील. त्या निर्णयांमध्ये शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन असेलच, पण कोणते काम कसे करायचे? आणि कुणाकडे कोणते पद द्यायचे? याचे निर्णय नवीन पिढी घेईल, असे रोहित पवार म्हणाले.

 

महाराष्ट्रासाठी खूप काही करायचेय
रोहित पवार (Rohit Pawar) पुढे म्हणाले, मी म्हणत नाही की हे काम आम्ही करू, पण नवीन पिढी (New Generation) त्याठिकाणी निर्णय घेईल. मी फार पुढचा विचार करून राजकारणात आलो आहे. मी पदाचा विचार केला असे नाही, पण मतदारसंघासाठी आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) खूप काही करायचे आहे.

 

Web Title :- Rohit Pawar | after 2024 sharad pawar and ajit pawar will guide but decision have to take by new generation statement by rohit pawar in junnar of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…