भाई का बर्थडे ! पार्थ लाखोंच्या मताधिक्यांने विजयी होणारच..!

बंधू रोहित पवार यांचा विश्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माढा लोकसभा मरदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार निवडणूक लढणार होते. मात्र त्यांनी लोकसभेतून माघार घेतली त्याचवेळी पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र तेव्हा आजोबांनी पुनर्विचार करावा अशी जाहीर विनंती रोहितने केली होती. या विनंतीने पार्थ-रोहित मध्ये वादाचा रंग असल्याची चर्चा राज्यभर रंगली. मात्र त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून पुन्हा एकदा ‘हम एक है’ असे दाखवून दिले आहे. रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत एवढेच नाही तर एक स्पेशल पोस्ट देखील शेअर केली आहे. यात एकत्र होळी साजरी केल्याचे फोटोज देखील आहेत. तसेच ‘प्रत्येक स्तरातून पार्थ पवार यांना मिळणारा पाठिंबा बघता, लाखोंच्या मताधिक्यांने ते विजयी होणार आहेत हे नक्कीच’, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

काय आहे रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट ?

“माझे बंधु पार्थ पवार यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा.

काल चिंचवड आणि देहू परिसरात पार्थ पवार यांच्यासोबत तरुणांच्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. गाथा मंदिर येथे तुकोबारायांचे दर्शन घेण्यात आले तसेच ठिकठिकाणी होळीच्या सणात मोठ्या आनंदाने सहभागी होता आले.

ज्या उत्साहाने पार्थ पवारांच्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं आहे, त्याहून अधिक जोमाने स्थानिक कार्यकर्ते, हितचिंतक व सर्वसामान्य तरुण प्रचारासाठी जोर लावत आहेत. काल पार्थ पवार यांच्या उपस्थितीत या तरुणांसोबत प्रचारदौऱ्यात सहभागी होता आलं. प्रत्येक ठिकाणाहून आणि समाजतील प्रत्येक स्तरातून पार्थ पवार यांना मिळणारा पाठिंबा बघता, लाखोंच्या मताधिक्यांने ते विजयी होणार आहेत हे नक्कीच”.

Loading...
You might also like