पूनम महाजनांच्या टीकेचा शरद पवारंच्या नातवाकडून समाचार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून रोहीत पवार यांनी पोस्ट केली आहे.

राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी आजपर्यंत महिलांबाबत बेताल वक्तव्ये केली. तेव्हा पूनम महाजन डोळ्यावर पट्टी बांधून होत्या, आता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहिले ते तुम्हीच सांगा, असा सवाल करत रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. त्यावर त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या तीन भाजप नेत्याच्या नावांचा उल्लेखही केला आहे. रोहित पवार यांच्या प्रत्युत्तरावर सोशल मीडियावर र्चचाही होत आहे.

गिरीष महाजन म्हणाले होते, “दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.  ”गिरीष बापट म्हणाले होते, “तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.” राम कदम म्हणाले होते, “पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे… आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हि विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असं म्हटले होते. तर यात शरद पवार यांना शकुनी मामा असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पूनम यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे.