Rohit Pawar | मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात म्हणूनच असे लोक सरकारमध्ये आहेत; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चांगलेच तापले असून सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायराण घोटाळ्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावर आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारी बंद पाडले होते. त्यावर आज विरोधी पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

 

आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, संजय राठोड यांनी पाच एकर जमीन एका खासगी व्यक्तीला दिली. सत्तारांनंतर हे प्रकरण आम्ही सभआगृहामध्ये उपस्थित करू. अपेक्षा एवढीच आहे की, एखाद्या प्रकरणावर जर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असतील तर लगेच त्या व्यक्तीला निलंबीत करणे किंवा पदावरून बाजूला करणे आवश्यक असते. पण सरकार काही हे करताना दिसत नाही. कदाचित मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात. म्हणूनच अशा प्रकारचे लोक सरकारमध्ये आहेत, हे योग्य नाही.

 

‘आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो. तेव्हा आमच्यादेखील नेत्यांवर आरोप झाले होते, ते सिध्दही झाले नव्हते. तरी आमच्या काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात तर उच्च न्यायालयाने मंत्र्यांवरच ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावाच लागेल.’ अशी भूमिका रोहित पवारांनी (Rohit Pawar) या प्रकरणावर बोलताना मांडली.

तसेच महाराष्ट्राचा कर्नाटक विरोधी ठराव टोकदार नसल्याचेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, ‘कर्नाटक विरोधातला ठराव आज विधीमंडळात मांडला जाणार आहे.
मात्र महाराष्ट्र सरकारने केलेल्या ठरावात फक्त कर्नाटक प्रकरणाचा निषेध केला आहे.
याउलट कर्नाटक सरकारने मांडलेल्या ठरावात त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर देखील टीका केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ठरावात असे सांगितले आहे की, त्यांच्यासाठी हा विषय संपलेला आहे.
मात्र आपण आपल्या ठरावात स्पष्ट भूमिका मांडत नाही आहोत. दुसरे म्हणजे कर्नाटक सरकारने त्यांच्या ठरावात वकीलाचे नाव देखील नमूद केले आहे. आणि महाराष्ट्राच्या ठरावात वकिलांचे नाव नाही.’ अशी खोचक टीकादेखील रोहित पवारांनी.(Rohit Pawar) यावेळी बोलताना केली.

 

Web Title :- Rohit Pawar | dispute between eknath shinde and devendra fadnavis says ncp mla rohit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raja Bapat Passed Away | ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Cyber Crime | मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला सायबर चोरट्याने घातला 5 लाखांना गंडा

Lalit Prabhakar | अभिनेता ललित प्रभाकरचा आगामी चित्रपट ‘टर्री’चा पोस्ट आउट; लिलतच्या रांगड्या लुकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष