पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘छत्रपती’ उपाधीचा ‘मान’ राखला नाही : रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात मोठे खिंडार पडले आहे. उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार होते. मात्र, ते उपस्थित राहू शकले नाहीत. अशा रितीने नरेंद्र मोदी यांनी ‘छत्रपती’ उपाधीचा मान राखला नाही, ‘छत्रपती’ या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे अशी पोस्ट शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबूकवर केली आहे.

‘छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उधी मागे असणारा व्यक्ती नाही तर उपाधी मला महत्वाची वाटते. अशावेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येत, पण तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एक सांगायचं आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणताही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा’, अशी पोस्ट रोहित पवार यांनी आपल्या फेसबूक लिहिली आहे.

साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील तसेच केंद्रातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली नाही. अशा रीतीने नरेंद्र मोदी यांनी ‘छत्रपती’ या उपाधीचा मान राखला नाही असे त्यांना वाटत आहे. त्यांनी आपली भावना फेसबूकद्वारे स्पष्ट केली.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या