Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

पुणे : अजित पवारांचे (Ajit Pawar) निकटवर्तीय मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी एका प्रचारसभेत अजित पवारांच्या समोरच शरद पवारांच्या (Sharad Pawar) व्याधीचा विषय मांडत, त्यांच्यावर टीका केली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, समोर असता तर कानाखाली मारण्याची माझी इच्छा झाली होती, अशा शब्दा आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच यावरून अजित पवारांना देखील सुनावले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, एक कुठलातरी वेडा माणूस तिथे व्यासपीठावर आणला होता बांदल नावाचा. समोर असता तर कानाखाली मारण्याची माझी इच्छा झाली होती. अजित पवारांची काही बोलण्याची हिंमत झाली का? तिथे खाली मान घालून बसले होते.

थोडी तरी हिंमत झाली का त्याला ए खाली बस बोलण्याची? आहेत ना तुम्ही वाघासारखे बोलणारे? मग आज काय झालं? तुम्ही मांजरासारखे बसले होते, असे म्हणत रोहित पवार यांनी अजितदादांना देखील सुनावले.

रोहित पवार पुढे म्हणाले, तुमची त्याला शांत बसवायची हिंमत झाली नाही का? की मग तुम्हाला ज्या गोष्टी बोलता येत नाहीत, त्या तुम्ही असल्या पाळलेल्या मांजरांकडून बोलून घेताय? हे असलं राजकारण बाजूला ठेवा. तुम्ही दुसऱ्याच्या तोंडातून शरद पवारांबद्दल बोलून घेताय. हे मी खपवून घेणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.

मंगलदास बांदल अजितदादांच्या समोर भाषणात काय म्हणाले…

मंगलदास बांदल म्हणाले, सूर्यकांत पलांडे शिरूरचे आमदार होते. शरद पवार त्यांना सोडून निघून गेले. त्यावेळी पलांडे हात मागे घेऊन भाषण करायचे. या काळात त्यांच्या हातावर कोडाचा प्रकार आला. त्यामुळे ते बाह्या पुढे घेत होते. शरद पवारांनी त्यांनाही सोडले नाही. ते म्हणाले, तुमच्या तालुक्यातला एक गडी फार बाह्या सरसावून भाषण करायचा, आता का बाह्या पुढे करतोय?

अरे तुम्ही सगळ्यांच्या व्यंगावर बोललात ना? तुम्ही कुणावर नाही बोललात? दिलीप ढमढेरे जुन्नरचे आमदार होते. त्यांचा पाय तुटलेला होता. शरद पवार म्हणाले पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायांनी द्या, दीड पायांनी देऊ नका. तुमच्या व्याधीवर कुणीही बोललेलं नाही.

तुमची किंमत यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे एवढे लक्षात ठेवा.
तुम्हाला जरी आजार झाला, तरी महाराष्ट्रातल्या कुठल्या माणसाने तुमची प्रतारणा केली नाही.
कारण यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे, असे बांदल म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत