Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाबरोबर (BJP) गेलात तर भाजपाची स्क्रिप्ट वाचावीच लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) तेच झाले. आता अजितदादां (Ajit Pawar) बरोबरही तेच होत आहे. पण, भाजपाला कुठेही पवार हे परवडणारे नाहीत. टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न मागील काही महिन्यात झाला आहे. आता पवार विरुद्ध पवार करण्याची भाजपची इच्छा आहे, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.

काल बारामतीमध्ये एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिले.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, केंद्र सरकारमधील नेते त्यांच्या पूर्ण ताकदीचा आम्हाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतील. संघर्ष यात्रा, पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाण्याचा विचार करत असतो. लोकांना महत्व देण्याचा विचार करत असतो. लोकांमध्ये जाणे त्यांना योग्य वाटत नसेल तर तो त्यांचा विषय आहे.

रोहित पवार म्हणाले, आम्ही लोकांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर लढणार आहोत.
जे सत्तेत आहेत ते पैशांच्या आणि अहंकाराच्या ताकदीवर आहेत.
निवडून आलो तर लोकांमुळे, निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच, पण आम्ही आमचा विचार सोडणार नाही, लढत राहणार.

ते पुढे म्हणाले, शरद पवार यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा केला. लोकांशी संपर्क ठेवला. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी
जे केले त्याला बंड म्हणता येणार नाही. त्यावेळी अनेक लोकांनी एकत्र येऊन तो निर्णय घेतला होता.
आता सत्तेत असणारे नेते अनेक वर्ष शरद पवारांमुळे सत्तेत होते. आपल्यावर कारवाई होईल म्हणून काही लोक सत्तेत गेले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”